महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टॉप ५ इलेक्ट्रिक स्कूटर्स २०२५ मध्ये – किंमत, मायलेज आणि फीचर्स

टॉप इलेक्ट्रिक स्कूटर


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टॉप ५ इलेक्ट्रिक स्कूटर्स २०२५ मध्ये – किंमत, मायलेज आणि फीचर्स

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन (EV) झपाट्याने वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती, प्रदूषणाचे संकट आणि ग्रीन मोबिलिटीकडे यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर्स आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही लोकप्रिय झाले आहेत. कमी मेंटेनन्स, स्वस्त, आणि आधुनिक फीचर्स यामुळे EV स्कूटर्स कॉलेज युथसाठी एक उत्तम पर्याय आहेत.

२०२५ मध्ये मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण यामधून योग्य स्कूटर निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टॉप ५ बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर्स, त्यांची किंमत, मायलेज (रेंज) आणि खास फीचर्स.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनेक उत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत. जर तुमचा बजेट ₹८५,००० ते ₹१,२५,००० दरम्यान असेल, तर खालील टॉप ५ EV स्कूटर्स तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरतील. किंमत, मायलेज, फीचर्स आणि ब्रँड विश्वसनीयता पाहून निर्णय घ्या.

१. Ola S1 Air (ओला S1 एअर)
🔹 अंदाजे किंमत : ₹८४,९९९ (एक्स-शोरूम)

🔹 मायलेज/रेंज : १२५ किमी एका चार्जमध्ये

🔹 टॉप स्पीड : ९० किमी/ताशी

फीचर्स :-
• ३ kWh बॅटरी
• रिव्हर्स मोड, हिल होल्ड
• ३४ लिटर अंडर सीट स्टोरेज
• Ola OS ऑपरेटिंग सिस्टीम
• क्रूझ कंट्रोल

का घ्यावी?
Ola S1 Air ही बजेटमध्ये एक परफेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे. याचे आकर्षक डिझाईन, डिजिटल डॅशबोर्ड आणि ॲप कनेक्टिव्हिटी यामुळे ती 'ट्रेंडी' आणि स्मार्ट आहे.

🔹 अंदाजे किंमत : ₹१,२५,०००

🔹 मायलेज/रेंज : १४५ किमी एका चार्जमध्ये

🔹 टॉप स्पीड : ८२ किमी/ताशी

फीचर्स :-
• ४.५६ kWh लिथियम आयन बॅटरी
• ७-इंच टचस्क्रीन डिस्प्ले
• Turn-by-turn नेव्हिगेशन
• USB चार्जिंग
• पार्किंग असिस्ट

का घ्यावी?
TVS iQube ST ही स्टायलिश आणि प्रीमियम लुक असलेली स्कूटर आहे. कॉलेजमध्ये रोजच्या वापरासाठी ती भरवशाची आणि टिकाऊ पर्याय आहे. हिची रेंजही इतरांपेक्षा जास्त आहे.

🔹 अंदाजे किंमत : ₹१,०९,९९९

🔹 मायलेज/रेंज : १२३ किमी

🔹 टॉप स्पीड : ८० किमी/ताशी

फीचर्स :-
• २.९ kWh बॅटरी
• IP67 वॉटरप्रूफ रेटिंग
• २२ लिटर स्टोरेज
• स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी
• राइड स्टॅटिस्टिक्स आणि ट्रॅकिंग

का घ्यावी?
Ather Rizta S ही फीचर्ससह येणारी स्कूटर आहे. हिची बिल्ड क्वालिटी उत्कृष्ट आहे आणि अ‍ॅप बेस्ड कंट्रोल मुळे विद्यार्थी त्यांच्या स्कूटरचा वापर अधिक स्मार्ट पद्धतीने करू शकतात.

🔹 अंदाजे किंमत : ₹१,१५,०००

🔹 मायलेज/रेंज : ११३ किमी

🔹 टॉप स्पीड : ७३ किमी/ताशी

फीचर्स :-
• २.९ kWh IP67 सर्टिफाईड बॅटरी
• स्टील मेटल बॉडी
• डिजिटल LCD डिस्प्ले
• मोबाइल अ‍ॅप सपोर्ट
• रिव्हर्स मोड

का घ्यावी?
बजाज चेतक ही टिकाऊ बॉडी, क्लासिक लुक आणि सहज चालवता येणारी यामुळे ही स्कूटर विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरते.

🔹 अंदाजे किंमत : ₹१,०५,०००

🔹 मायलेज/रेंज : ११० किमी

🔹 टॉप स्पीड : ८० किमी/ताशी

फीचर्स :-
• ३.४४ kWh रिमूवेबल बॅटरी
• स्मार्ट कनेक्टिव्हिटी
• OTA अपडेट्स
• राइड मॉड्स – Eco, Ride, Sport
• फास्ट चार्जिंग

का घ्यावी?
Hero च्या या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सहज बदलता येणारी बॅटरी आहे, जी होस्टेल किंवा घरात चार्ज करता येते. Vida V1 Plus ही शहरी विद्यार्थ्यांसाठी योग्य, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या आधुनिक स्कूटर आहे.

कॉलेज विद्यार्थ्यांनी EV स्कूटर घेताना काय लक्षात घ्यावं?
१. रोज कॉलेजला जाताना किती अंतर कापायचं आहे यानुसार रेंज ठरवा. 100 किमीपेक्षा जास्त रेंज असलेली स्कूटर उत्तम.

२. घरात किंवा हॉस्टेलमध्ये चार्जिंग सॉकेट असेल का ते तपासा.

३. रिमूवेबल बॅटरी असल्यास चार्ज करणे सोपे जाते.

४. स्मार्टफोन अ‍ॅप, नेव्हिगेशन, सिक्युरिटी अलर्ट्स यासारखी फीचर्स उपयुक्त ठरतात.

५. सर्व्हिसिंग आणि वॉरंटीबद्दल माहिती घ्या.



थोडे नवीन जरा जुने