फार्मर आयडी
शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध अनुदान, योजना आणि सबसिडी मिळवण्यासाठी Farmer ID असणे अनिवार्य झाले आहे. या ब्लॉगमध्ये आपण Farmer ID म्हणजे काय, याचे फायदे, आणि Farmer ID ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
Farmer ID म्हणजे काय?
Farmer ID हा एक युनिक ओळख क्रमांक आहे जो भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कृषि विभागाकडून अधिकृतपणे शेतकऱ्यांना दिला जातो. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, जमीन मालकीची माहिती, पीक प्रकार यांसारखी माहिती असते. हा ID डिजिटल स्वरूपात मिळतो.
Farmer ID ही डिजिटल काळातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची ओळख बनत चालली आहे. यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळतो. तुम्ही अजूनही तुमचा Farmer ID रजिस्ट्रेशन केले नसेल, तर आजच खाली दिलेल्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करा.
Farmer ID चे फायदे (Benefits of Farmer ID)
१. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक.
२. पीक विमा योजना, पीएम किसान योजना, कृषी सबसिडी यासाठी उपयुक्त.
३. शेतीसाठी सुलभ कर्ज प्रक्रिया.
४. डिजिटल किसान डेटाबेस तयार होतो.
५. PM-Kisan, Crop Insurance, DBT इत्यादी साठी एकच ID
Farmer ID मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
१. आधार कार्ड
२. ७/१२ उतारा
३. बँक पासबुक (IFSC कोडसह)
४. मोबाईल क्रमांक (OTP साठी)
५. पासपोर्ट साईझ फोटो
Farmer ID साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
१. आपल्या राज्याच्या कृषि विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - MahaAgri
२. नवीन शेतकरी नोंदणी किंवा Farmer Registration असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
३. तुमचा आधार क्रमांक टाका.
४. OTP द्वारे व्हेरिफिकेशन करा.
५. आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांकच वापरा.
६. तुमचं पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख, लिंग इत्यादी माहिती अचूक भरा.
७. मोबाईल नंबर आणि ईमेल ID (असल्यास) नोंदवा.
८. तुमच्या मालकीची जमीन ७/१२ उतारा किंवा जमिनीचा तपशील जमीन क्षेत्रफळ, गट नंबर, पीक प्रकार एक किंवा अधिक जमिनी असल्यास सर्व माहिती द्या
९. IFSC कोडसह बँक खात्याचा क्रमांक, बँकेचे नाव आणि शाखा टाका.
१०. बँक पासबुक स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे असते. आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक आणि फोटो यांची स्कॅन प्रत (PDF/JPEG फॉर्मॅटमध्ये) अपलोड करा.
११. सर्व माहिती योग्य प्रकारे तपासून Submit बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाला की, तुम्हाला अर्ज क्रमांक/फॉर्म नंबर दिला जाईल.
Farmer ID Status कसा तपासायचा?
१. वेबसाइटवर Application Status किंवा Check Farmer ID पर्याय निवडा.
२. अर्ज क्रमांक किंवा आधार नंबर टाका.
३. तुमचा Farmer ID तयार झाला असल्यास, तो डाउनलोड करण्यासाठी लिंक दिसेल.
Farmer ID Download कसा करायचा?
१. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही PDF स्वरूपात तुमचा Farmer ID डाउनलोड करू शकता.
२. यासाठी लॉगिन करून डॅशबोर्डमध्ये जा व Download Farmer ID वर क्लिक करा.
महत्त्वाच्या सूचना
• एकच शेतकरी अनेकवेळा रजिस्ट्रेशन करू शकत नाही.
• चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
• आधार मोबाईलशी लिंक असणे गरजेचे आहे.
🤔 तुमचे प्रश्न – आमची उत्तरे (FAQs)
१. Farmer ID सर्व राज्यात लागू आहे का?
→ होय, बहुतांश राज्यांनी आपला शेतकरी डेटाबेस तयार केला असून Farmer ID ची गरज सर्वत्र आहे.
२. शेत जमीन नसलेल्या व्यक्तीला Farmer ID मिळू शकतो का?
→ जर जमीन आपल्या नावावर नसेल तर शेतकरी म्हणून पात्रता सिद्ध करणे कठीण जाते.
३. मोबाइलवर Farmer ID मिळतो का?
→ होय, काही पोर्टल्सवर Farmer ID SMS द्वारे किंवा PDF फाईलद्वारे पाठवला जातो.
