What is SQL?

SQL म्हणजे काय?


What is SQL?


• SQL (Structured Query Language) ही एक डेटाबेसशी संवाद साधण्यासाठी वापरली जाणारी भाषा आहे. याच्या मदतीने आपण डेटाबेस तयार, बदल, अपडेट आणि क्वेरी करू शकतो. 

• SQL चा वापर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम (DBMS) किंवा Relational Database Management System (RDBMS) सोबत केला जातो.

SQL चे पूर्ण रूप :-
S – Structured
Q – Query
L – Language

मराठी अर्थ :- संरचित चौकशी भाषा

SQL चा उपयोग कशासाठी होतो?

१. डेटाबेस तयार करणे (Create Database)
२. टेबल तयार करणे (Create Table)
३. डेटा घालणे (Insert Data)
४. डेटा शोधणे (Select Data)
५. डेटा बदलणे (Update Data)
६. डेटा काढून टाकणे (Delete Data)
७. डेटा फिल्टर आणि सॉर्ट करणे (Filtering & Sorting)
८. वापरकर्त्यांचे नियंत्रण ठेवणे (User Permissions)

SQL चे प्रकार (Types of SQL Commands)

SQL मध्ये पाच प्रमुख कमांड्स असतात
१. DDL - Data Definition Language - टेबल्स आणि स्ट्रक्चर तयार/बदल/डिलीट करणे. 
२. DML - Data Manipulation Language - डेटामध्ये Insert, Update, Delete करणे
३. DCL - Data Control Language - डेटाबेसवरील प्रवेश नियंत्रित करणे
४. TCL - Transaction Control Language - डेटाबेसमधील ट्रान्झॅक्शन व्यवस्थापित करणे
५. DQL - Data Query Language - डेटाबेसमधून डेटा शोधणे

महत्त्वाच्या SQL कमांड्स

CREATE TABLE - नवीन टेबल तयार करणे
INSERT INTO - टेबलमध्ये डेटा घालणे
SELECT - डेटा शोधणे आणि दाखवणे 
UPDATE - डेटामध्ये बदल करणे 
DELETE - डेटा हटविणे 
ALTER TABLE - टेबलची रचना बदलणे 
DROP TABLE - टेबल हटविणे 
WHERE - अटी लावणे 
ORDER BY - डेटा क्रमवार लावणे 
GROUP BY - डेटा गट करणे

SQL चे काही उदाहरणे

१. टेबल तयार करणे
CREATE TABLE Students (
   ID INT,
   Name VARCHAR(50),
   Age INT,
   City VARCHAR(30)
);

२. डेटा घालणे
INSERT INTO Students (ID, Name, Age, City)
VALUES (1, 'Rahul', 20, 'Pune');

३. डेटा शोधणे
SELECT * FROM Students;

४. डेटा शोधणे
SELECT Name, City FROM Students WHERE Age > 18;

SQL वापरणारी लोकप्रिय डेटाबेस सिस्टीम्स

MySQL
SQLite

SQL चे फायदे

१. वापरण्यास सोपी आणि संरचित भाषा
२. मोठ्या प्रमाणात डेटा हाताळण्यासाठी सक्षम
३. विविध डेटाबेससह सुसंगत
४. डेटा सुरक्षितपणे व्यवस्थापित करता येतो
५. डेटाचे क्वेरी, अपडेट आणि ॲनालिसिस सहज करता येते
थोडे नवीन जरा जुने