कॅप्चा म्हणजे काय?
Captcha म्हणजे Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart. थोडक्यात सांगायचं झालं, तर Captcha हा एक सुरक्षा आहे, जो वेबसाइट्सवर बोट्स (bots) आणि मानवी युजर्स यांच्यात फरक ओळखण्यासाठी वापरला जातो.
उदाहरणार्थ, तुम्ही कधी लॉगिन करताना किंवा एखादं फॉर्म भरताना मी रोबोट नाही असं चेकबॉक्स बघितलं असेल, किंवा तुम्हाला सर्व सिग्नल असलेले फोटो निवडा असं विचारलं असेल – हेच Captcha आहे.
Captcha हे इंटरनेटच्या जगात एक महत्त्वाचे सुरक्षा साधन बनले आहे. वेबसाइट्सना स्पॅम, हॅकिंग, आणि बोट्सच्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी Captcha अतिशय उपयुक्त आहे.
तुम्ही जेव्हा वेबसाइट्सवर Captcha बघता, तेव्हा लक्षात ठेवा की ही एक सुरक्षा कवच आहे – तुमच्यासाठी!
Captcha चे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
स्पॅम, हॅकिंग, आणि ऑटोमेटेड कृतींपासून वेबसाइटचे संरक्षण करणे. इंटरनेटवर अनेकदा स्क्रिप्ट्स वापरून बोट्स (स्वयंचलित संगणकीय प्रोग्राम्स) वेबसाइट्सवर नको असलेली कामे करतात जसे की -
• बनावट अकाउंट्स तयार करणे.
• कंमेंट सेक्शनमध्ये स्पॅम पोस्ट करणे.
• लॉगिन क्रेडेन्शियल्स हॅक करण्याचा प्रयत्न करणे
• वेबसाइट्सवर ट्रॅफिक वाढवून सर्व्हर क्रॅश करणे
Captcha कधी आणि कुठे वापरला जातो?
१. लॉगिन फॉर्म – चुकीचे पासवर्ड अनेकदा टाकल्यास Captcha दिसतो.
२. रजिस्ट्रेशन फॉर्म – बनावट अकाउंट्स टाळण्यासाठी.
३. ऑनलाइन मतदान / सर्व्हे – एकच व्यक्ती अनेक वेळा मतदान करू नये म्हणून.
४. ई-कॉमर्स साइट्सवर – उत्पादन ऑर्डर करताना किंवा चेकआऊट करताना.
५. कंमेंट सेक्शन / फीडबॅक फॉर्म्स – स्पॅम रोखण्यासाठी.
६. सार्वजनिक API प्रवेशासाठी – स्क्रॅपिंग रोखण्यासाठी.
Captcha चे प्रकार :-
Captcha चे विविध प्रकार आहेत. खाली काही मुख्य प्रकार दिले आहेत.
१. Text-Based Captcha
यात तुम्हाला काही वाकडी अक्षरं किंवा अंक दिले जातात, आणि ते ओळखून टाईप करायचे असतात.
२. Image-Based Captcha
यात सर्व बाईक असलेले फोटो निवडा किंवा सिग्नल असलेली चित्रं निवडा असे विचारतात.
३. Audio Captcha
यामध्ये आवाजात काही शब्द किंवा अंक सांगितले जातात, ते ऐकून टाकायचे असतात.
४. Checkbox Captcha (reCAPTCHA)
मी रोबोट नाही हा एक साधा चेकबॉक्स असतो. Google ने तयार केलेला असतो.
५. Invisible reCAPTCHA
यात युजरला काहीही करावं लागत नाही. ही युजरच्या वर्तनावरूनच ठरवते की समोर मानव आहे की रोबोट.
इंटरनेटवर Captcha चा उपयोग का होतो?
१. Captcha मुळे ब्रूट फोर्स अटॅक, स्पॅम, आणि ऑटोमेटेड हॅकिंग प्रयत्न थांबतात.
२. Captcha युजरद्वारेच असल्यामुळे महत्त्वाची माहिती लीक होण्याचा धोका कमी होतो.
३. बोट्समुळे सर्व्हरवर अनावश्यक लोड येतो, पण Captcha वापरल्यामुळे हे टाळता येते.
४. ब्लॉग्स, फोरम्स, आणि कमेंट सेक्शनमध्ये स्पॅम रोखण्यासाठी Captcha हा प्रभावी उपाय आहे.
५. एकच व्यक्ती अनेकदा मतदान करू नये म्हणून Captcha वापरला जातो.
Captcha चे फायदे :-
• मानव आणि रोबोट यामधला फरक ओळखता येतो.
• वेबसाइट्स सुरक्षित राहतात.
• युजर डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते.
• स्पॅम पोस्ट्स कमी होतात.
• खोट्या ट्रॅफिकमुळे सर्व्हर क्रॅश होण्याचा धोका कमी होतो.
