How to Update Your Aadhaar Details Online via UIDAI Portal

UIDAI पोर्टलवरून आधार कार्ड ऑनलाइन अपडेट कसे करावे?


How to Update Your Aadhaar Details Online via UIDAI Portal


आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. सरकारी योजना, बँकिंग सेवा, मोबाईल कनेक्शन, पासपोर्ट अर्ज अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या आधारमध्ये दिलेली माहिती नेहमी अचूक असणे गरजेचे आहे.

पण अनेक वेळा नावात चुका, पत्त्याचे बदल, जन्मतारखेतील चुक, फोटो अपडेट इत्यादी गरज भासते. यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे एक ऑनलाइन पोर्टल आहे, ज्याद्वारे नागरिक स्वतःच आधार माहिती ऑनलाइन अपडेट करू शकतात.

या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत की UIDAI पोर्टलवरून आधार कार्ड ऑनलाइन अपडेट कसे करावे, कोणती माहिती अपडेट करता येते, आवश्यक कागदपत्रे, फी व संपूर्ण प्रक्रिया.

आधारमध्ये कोणती माहिती ऑनलाइन अपडेट करता येते?

UIDAI च्या myAadhaar पोर्टल वरून खालील माहिती आपण ऑनलाइन अपडेट करू शकतो.
१. पत्ता (Address)
२. ईमेल आयडी (Email ID)
३. फोन नंबर (Mobile Number)
४. नाव, जन्मतारीख, लिंग
५. फोटो अपडेट – फक्त आधार सेवा केंद्रावर.

टीप :- आधार नंबर, बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट, आयरिस) यांसारख्या बाबी ऑनलाइन बदलता येत नाहीत त्यासाठी केंद्रावर जावे लागेल.

ऑनलाइन आधार अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्ही जर तुमचा पत्ता किंवा इतर माहिती अपडेट करत असाल, तर तुम्हाला खालीलप्रमाणे कागदपत्रे लागतील.

१. पत्ता अपडेटसाठी - वीज बिल/पाणी बिल/गॅस बिल (३ महिन्यांच्या आतले), बँक स्टेटमेंट/ पासबुक, आधार कार्ड असलेल्या नातेवाईकाचे प्रमाणपत्र (जर तुम्ही त्यांच्या पत्त्यावर राहत असाल)

२. नाव/जन्मतारीख/लिंग अपडेटसाठी - पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, पासपोर्ट


UIDAI पोर्टलवरून आधार माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया

१. UIDAI ची अधिकृत वेबसाइट आहे : 

२. Login बटणावर क्लिक करा, तुमचा १२ अंकी आधार नंबर टाका, OTP द्वारे लॉगिन करा.

३. डॅशबोर्डमध्ये Update Aadhaar Online या पर्यायावर क्लिक करा, तुम्हाला कोणती माहिती अपडेट करायची आहे ते निवडा.

४. नवीन माहिती भरा (उदा. नवीन पत्ता), आवश्यक कागदपत्रे PDF किंवा JPG फॉर्मेटमध्ये अपलोड करा.

५. एकदा सर्व माहिती भरल्यानंतर ₹५० शुल्क ऑनलाइन भरावे लागेल, UPI/डेबिट कार्ड/नेटबँकिंगद्वारे पेमेंट करा.

६. अर्ज पूर्ण सबमिट झाल्यावर तुम्हाला एक Update Request Number (URN) मिळेल. याचा उपयोग करून तुम्ही पुढील अपडेटचे स्टेटस तपासू शकता.

अपडेट स्टेटस कसे तपासाल?

१. UIDAI वेबसाइटवर लॉगिन करा.
२. Check Status – Update Request वर क्लिक करा.
३. तुमचा URN नंबर टाका.
४. अपडेट झाल्याची काही दिवसांत मिळेल.

किती वेळ लागतो?
ऑनलाइन अपडेटसाठी सामान्यतः ५ ते ७ दिवस लागतात.

काही महत्त्वाचे टीप्स

• आधार अपडेट करताना नेहमी स्पष्ट स्कॅन केलेले कागदपत्रे वापरा.
• पत्ता अपडेट करताना Address Validation Letter वापरू शकता.
• तुमचा मोबाइल नंबर आधारसोबत लिंक असणे आवश्यक आहे.
• एकच माहिती २ पेक्षा अधिक वेळा अपडेट होणार नाही.

आधार अपडेट का महत्त्वाचे आहे?

• सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी
• बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी
• पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स अर्जासाठी
eKYC व डिजिटल व्यवहारासाठी

UIDAI पोर्टलच्या माध्यमातून आधार अपडेट करणे आता अतिशय सोपे झाले आहे. फक्त योग्य कागदपत्रे आणि थोडीशी काळजी घेतल्यास तुम्ही घरबसल्या तुमचे आधार अपडेट करू शकता.
थोडे नवीन जरा जुने