How to Register and Use IPPB Mobile Banking App

IPPB मोबाईल बँकिंग अ‍ॅपमध्ये नोंदणी आणि वापर कसा करावा?


How to Register and Use IPPB Mobile Banking App


इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने ग्राहकांना ही सुविधा देण्यासाठी IPPB मोबाईल बँकिंग अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप वापरून तुम्ही विविध प्रकारच्या बँकिंग सेवा अगदी सहज आणि सुरक्षितपणे वापरू शकता.

या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की IPPB मोबाईल अ‍ॅप मध्ये नोंदणी कशी करावी, मुख्य फीचर्स कोणती आहेत, आणि ते अ‍ॅप वापरण्याचे फायदे काय आहेत.

IPPB म्हणजे India Post Payments Bank – ही एक पेमेंट बँक आहे जी भारत सरकारच्या अंतर्गत काम करते. IPPB चे उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत डिजिटल बँकिंग सेवा पोहोचवणे. देशभरात १.५ लाखाहून अधिक पोस्ट ऑफिसद्वारे IPPB सेवा उपलब्ध आहेत.

IPPB मोबाईल बँकिंग अ‍ॅप हे अँड्रॉइड व iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप वापरून ग्राहक खालील सेवा वापरू शकतात.
१. पैसे तपासू शकता.
२. फंड ट्रान्सफर (NEFT/IMPS)
३. मिनी स्टेटमेंट
४. युटिलिटी बिल पेमेंट
५. QR कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकता.
६. नवीन बचत खाते उघडू शकता.

IPPB मोबाईल अ‍ॅप डाउनलोड आणि नोंदणी कशी करावी?

१. अँड्रॉइड वापरकर्ते Google Play Store वर जाऊन IPPB Mobile Banking असे शोधा आणि अ‍ॅप डाउनलोड करा.
iPhone वापरकर्ते Apple App Store वरून IPPB अ‍ॅप डाउनलोड करा.

२. अ‍ॅप ओपन केल्यानंतर, तुम्ही Mobile Number, IPPB Account Number, Customer I'd, Date of Birth, तुमचं संपूर्ण नाव टाकून घ्या. आणि त्यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल तो टाका.

३. आता तुम्हाला MPIN (Mobile PIN) सेट करायला सांगितले जाईल. हे MPIN लॉगिन व व्यवहारासाठी वापरले जाईल. MPIN 4 किंवा 6 अंकी असतो.

४. MPIN सेट झाल्यानंतर तुम्ही यशस्वीरित्या IPPB मोबाईल बँकिंगसाठी नोंदणीकृत होता. आता तुम्ही विविध सुविधा वापरायला सुरुवात करू शकता.

IPPB मोबाईल अ‍ॅपचे मुख्य फीचर्स

१. घरबसल्या केवळ एका क्लिकवर पैसे तपासू शकता.
२. NEFT, IMPS किंवा QR कोडद्वारे मित्र, कुटुंब किंवा इतर खात्यांमध्ये सहज पैसे पाठवू शकता.
३. वीज, पाणी, मोबाईल, DTH इ. बिले IPPB अ‍ॅप वापरून भरू शकता.
४. दुकानदाराला QR कोड स्कॅन करून पटकन पैसे पाठवू शकता.
५. जर तुमच्याकडे IPPB खाते नसेल तर अ‍ॅपवरून नवीन डिजिटल बचत खाते उघडू शकता.

IPPB मोबाईल बँकिंग वापरण्याचे फायदे

१. दूरदराजच्या ग्रामीण भागात राहत असाल तरी देखील मोबाईलवरून बँकिंग सेवा सहज वापरता येतात.
२. IPPB अ‍ॅप इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे.
३. IPPB चे खाते उघडण्यासाठी किमान शिल्लक रक्कम लागणार नाही. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी फायदेशीर.
४. तुमचे IPPB खाते आधारशी लिंक असल्यामुळे सबसिडी व अन्य सरकारी लाभ थेट खात्यात जमा होतात.

IPPB मोबाईल बँकिंगचे महत्वाचे टिप्स 

१. MPIN कोणासोबतही शेअर करू नका.
२. फिशिंग किंवा स्पॅम कॉल्सपासून सावध राहा.
३. फक्त अधिकृत IPPB अ‍ॅपच वापरा.
४. नियमितपणे MPIN बदला.

सर्वसामान्य प्रश्न (FAQ)

प्रश्न १ : IPPB खाते कसे उघडावे?
उत्तर - जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या किंवा IPPB अ‍ॅप वापरून डिजिटल बचत खाते उघडू शकता.

प्रश्न ३ : IPPB अ‍ॅप साठी कोणता मोबाइल नंबर लागतो?
उत्तर - जो नंबर IPPB खात्याशी लिंक केलेला आहे तोच नंबर वापरावा.

प्रश्न ३ : MPIN विसरलो असेल तर काय करावे?
उत्तर - अ‍ॅपमध्ये Forgot MPIN पर्याय आहे. त्यावर क्लिक करून नवीन MPIN तयार करता येतो.
थोडे नवीन जरा जुने