UMANG App म्हणजे काय? याचा वापर कसा करावा?

Umang Application


UMANG App म्हणजे काय? याचा वापर कसा करावा?


भारत सरकारने विविध सरकारी सेवा एका मोबाइल अ‍ॅपमध्ये आणण्यासाठी UMANG App (Unified Mobile Application for New-Age Governance) लॉन्च केलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना विविध सरकारी सेवा मोबाईलवर सहज, सुरक्षित आणि वेगवान पद्धतीने मिळू शकतात. आपण UMANG अ‍ॅप म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा, त्याचे फायदे आणि नोंदणी प्रक्रिया याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

UMANG App म्हणजे काय?
UMANG (Unified Mobile Application for New-Age Governance) हे एक मल्टी-सर्विस मोबाइल अ‍ॅप आहे, जे भारत सरकारच्या Digital India मोहिमेअंतर्गत विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपचा उद्देश म्हणजे नागरिकांना केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि स्थानिक संस्थांच्या सेवा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे.

UMANG अ‍ॅपमध्ये १०००+ सेवा उपलब्ध आहेत, जसे की आधार, पॅन कार्ड, ईपीएफओ, एनपीएस, पीएम किसान, डिजिलॉकर, रेशन कार्ड, पेंशन योजना, शिक्षण सुविधा, आरोग्य सेवा इत्यादी.

UMANG अ‍ॅप चे मुख्य वैशिष्ट्ये :-
• एकाच अ‍ॅपमध्ये अनेक सेवा
• हिंदी, मराठीसह १३+ भाषांचा सपोर्ट
• मोफत डाउनलोड आणि वापर
• सुरक्षित लॉगिन व डेटा एनक्रिप्शन
• चॅटबॉट सहाय्य व ग्राहक सेवा सपोर्ट
• Android, iOS आणि वेबसाईटवर उपलब्ध

UMANG App वर नोंदणी कशी करावी?
१. Google Play Store किंवा Apple App Store वरून “UMANG” शोधा आणि अ‍ॅप डाउनलोड करा.
२. Sign Up (नोंदणी) वर क्लिक करा
३. आपला मोबाइल नंबर टाका व OTP मिळवा.
४. आपला नाव, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
५. लॉगिनसाठी ४ अंकी MPIN तयार करा.
६. काही सेवा वापरण्यासाठी आधार नंबर लिंक करणे आवश्यक असू शकते.

UMANG App चा वापर कसा करावा?
नोंदणी पूर्ण केल्यावर तुम्ही खालील प्रकारे सेवा वापरू शकता -
१. EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) :-
PF बॅलन्स तपासणे
पासबुक डाउनलोड
क्लेम स्टेटस पाहणे

२. PAN Card सेवा :-
PAN स्टेटस तपासणे
नवीन PAN अर्ज करणे

३. PM-KISAN योजना :-
हप्त्याची स्थिती तपासणे
अर्ज स्टेटस पाहणे

४. डिजिलॉकर सेवा :-
मार्कशीट, लायसन्स, आधार कार्ड डाउनलोड
सुरक्षित डॉक्युमेंट स्टोरेज

५. पेंशन सेवा (Pension Seva) :-
जीवन प्रमाणपत्र सबमिट करणे
पेन्शन स्टेटस तपासणे

६. उमंगवरील इतर लोकप्रिय सेवा :-
गैस सबसिडी
नरेगा जॉब कार्ड
सीबीएसई / एनटीए निकाल
आयुष्मान भारत योजना

UMANG App चे फायदे :-
१. सरकारी सेवा शोधण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जाण्याची गरज नाही.
२. सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही, घरबसल्या सेवा मिळतात.
३. मराठीसह इतर भाषांमधील सुविधा.
४. नवीन सेवा, पेमेंट अपडेट्सची माहिती वेळेवर मिळते.

UMANG App बाबत महत्त्वाचे प्रश्न (FAQ)

प्र.१ UMANG App कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहे?
उत्तर - UMANG App सध्या 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे - मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ इत्यादी.

प्र.२ UMANG App सुरक्षित आहे का?
उत्तर - होय. UMANG हे सरकारमान्य अ‍ॅप असून, यामध्ये सर्व डेटा एनक्रिप्टेड स्वरूपात सुरक्षित ठेवला जातो.

प्र.३ UMANG अ‍ॅप वापरण्यास पैसे लागतात का?
उत्तर - नाही. UMANG App पूर्णपणे मोफत आहे.

UMANG App डाउनलोड लिंक :-
• Android

• IOS

• वेब पोर्टल
थोडे नवीन जरा जुने