Best Free Certificate Courses Platforms to Boost Your Career in 2025

मोफत सर्टिफिकेट कोर्सेस प्लॅटफॉर्म्स


Best Free Certificate Courses Platforms to Boost Your Career in 2025


करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ डिग्री पुरेशी नाही. उद्योगातील ट्रेंडनुसार नविन कौशल्यं आत्मसात करणे गरजेचे आहे. २०२५ मध्ये, अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय शैक्षणिक प्लॅटफॉर्म्सनी मोफत प्रमाणपत्र (Free Certificate) कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. हे कोर्सेस केवळ तुमचं ज्ञान वाढवत नाहीत, तर तुमचं CV अधिक प्रभावी करतात.


तुम्ही IT मध्ये असाल, मार्केटिंगमध्ये, फ्रीलान्सिंगमध्ये किंवा स्टूडंट असाल — प्रत्येकासाठी योग्य कोर्सेस उपलब्ध आहेत.

काही सर्वोत्तम मोफत सर्टिफिकेट कोर्सेस प्लॅटफॉर्म्स आहे जे २०२५ मध्ये तुमच्या करिअरला एक नवी दिशा देतील.

👉 सुरुवात करा आजपासून! दररोज फक्त १ तास शिकूनही तुम्ही एक नवीन कौशल्य आत्मसात करू शकता.

१. Coursera (कोर्सेरा)
कोर्सेरा हा जगातील सर्वात प्रसिद्ध ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्हाला Stanford, Yale, Google, IBM सारख्या संस्थांचे कोर्सेस शिकायला मिळतात.
• मोफत कोर्सेससाठी “Audit” ऑप्शन
• काही कोर्सेसमध्ये Financial Aid घेऊन प्रमाणपत्र मोफत मिळू शकते
• उच्च गुणवत्तेचे व्हिडिओ लेक्चर्स आणि असाइनमेंट्स

लोकप्रिय कोर्सेस -
• Google IT Support
• Introduction to Data Science
• Digital Marketing Specialization

२. edX
edX हा MIT आणि Harvard यांनी सुरू केलेला प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्हाला जागतिक दर्जाचे कोर्सेस मोफत शिकता येतात.
• १५० पेक्षा अधिक टॉप युनिव्हर्सिटीजचे कोर्सेस
• Free Audit Mode
• प्रमाणपत्रासाठी Financial Assistance उपलब्ध

लोकप्रिय कोर्सेस -
• CS50x : Introduction to Computer Science (Harvard)
• Data Analysis for Life Sciences
• The Science of Happiness

३. Google Digital Garage
Google Digital Garage हे Google द्वारे चालवलेले एक विनामूल्य शिक्षण व्यासपीठ आहे जे खास डिजिटल कौशल्यांवर लक्ष केंद्रित करते.
• १००% मोफत प्रमाणपत्र
• Industry-recognized certificates
• Interactive learning experience

लोकप्रिय कोर्सेस -
• Fundamentals of Digital Marketing (Google Certified)
• Promote a Business with Online Advertising
• Understand Customers Needs and Online Behaviours

४. Udemy (उडेमी)
Udemy वर अनेक मोफत कोर्सेस उपलब्ध असतात, जे व्यावसायिक प्रशिक्षकांनी तयार केलेले आहे.
• विविध क्षेत्रातील कोर्सेस (Coding, Design, Marketing)
• Certificate of Completion
• वेळेनुसार शिकण्याची मुभा
“Free Courses with Certificate” असा सर्च करून सर्वोत्तम कोर्सेस मिळवू शकता.

५. SkillUp by Simplilearn
Simplilearn चा SkillUp हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे, ज्यामध्ये आपण IT, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या कोर्सेससह सर्टिफिकेट मिळवू शकता.
• Self-paced learning
• प्रमाणपत्रासह मोफत कोर्सेस
• Industry Ready Skills

लोकप्रिय कोर्सेस -
• Introduction to Cyber Security
• Basics of Python Programming
• SEO Fundamentals

६. LinkedIn Learning (लिंक्डइन लर्निंग)
LinkedIn Learning ही एक प्रोफेशनल प्लॅटफॉर्म असून १ महिन्याचा फ्री ट्रायल मध्ये तुम्ही Premium कोर्सेस सर्टिफिकेटसह पूर्ण करू शकता.
• CV आणि प्रोफाईलमध्ये थेट LinkedIn वर सर्टिफिकेट जोडणे
• Soft Skills आणि Tech Skills चे विविध कोर्सेस
• Industry Insights

लोकप्रिय कोर्सेस -
• Project Management Fundamentals
• Excel Essential Training
• Time Management for Professionals

७. FutureLearn
FutureLearn हे एक यूके बेस्ड प्लॅटफॉर्म आहे जे Open University आणि अनेक टॉप युनिव्हर्सिटीजसोबत कोर्सेस देते.
• मोफत कोर्समध्ये एक्सेस + प्रमाणपत्रासाठी कमी फी
• Weekly Learning Structure
• Discussion आधारित लर्निंग

लोकप्रिय कोर्सेस -
• How to Write Your First Song
• Introduction to Cyber Security
• Digital Skills : Artificial Intelligence

८. SWAYAM (भारत सरकार)
SWAYAM हा भारत सरकारचा उपक्रम आहे जो UGC, AICTE, NPTEL सारख्या संस्थांच्या माध्यमातून मोफत शिक्षण देतो.
• भारतीय अभ्यासक्रमावर आधारित
• प्रमाणपत्रासाठी नाममात्र फी
• विद्यापीठ मान्यतेसह कोर्सेस

लोकप्रिय कोर्सेस -
• Basic Electronics
• Business Communication
• Programming in Java (NPTEL)

९. Alison
Alison हा एक जागतिक प्लॅटफॉर्म आहे जो मोफत सर्टिफिकेट कोर्सेससाठी प्रसिद्ध आहे.
• 4000 पेक्षा अधिक कोर्सेस
• Skill Based Learning
• 100% Free with CPD Accreditation

लोकप्रिय कोर्सेस -
• Diploma in Project Management
• Web Development Fundamentals
• Introduction to Human Resources

१०. HubSpot Academy
डिजिटल मार्केटिंग, CRM, Sales यामध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांसाठी HubSpot Academy ही उत्तम संधी आहे.
• १००% मोफत प्रमाणपत्र
• Updated with latest industry tools
• Resume-friendly सर्टिफिकेट

लोकप्रिय कोर्सेस -
• Inbound Marketing Certification
• Social Media Strategy
• Email Marketing Basics


लेखक :- अभिषेक हजारे | bafalalinfo.in
थोडे नवीन जरा जुने