Digital India आणि My Bharat 2.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिशनचा पुढचा टप्पा

Digital India आणि My Bharat 2.0


Digital India आणि My Bharat 2.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिशनचा पुढचा टप्पा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१५ मध्ये सुरू झालेली Digital India मोहीम आता नव्या वळणावर आली आहे — My Bharat 2.0 च्या रूपाने. आपण पाहणार आहोत की Digital India ने काय साध्य केलं, My Bharat 2.0 कशासाठी आहे, आणि ह्या पुढच्या टप्प्यात भारत कसा बदलणार आहे.


Digital India : सुरुवात आणि यश
२०१५ मध्ये Digital India मोहिमेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मुख्य उद्दिष्ट ठरवली होती.
१. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे.
२. प्रत्येक नागरिकाला डिजिटल साक्षर बनवणे.
३. शासन सेवा सर्वांसाठी सहज उपलब्ध करणे.

Digital India चे काही मुख्य घटक :-
Aadhaar कार्ड - डिजिटल ओळख.
BHIM UPI - डिजिटल पेमेंटसाठी क्रांतिकारक अ‍ॅप.
DigiLocker - कागदपत्रे ऑनलाइन सुरक्षित ठेवण्याची सुविधा.
UMANG App - शासकीय सेवा एका ठिकाणी.
• आयुष्मान भारत डिजिटल मिशन - हेल्थ आयडीद्वारे आरोग्य सेवा डिजिटल करणे.

Digital India चा परिणाम :-
• UPI ट्रान्झॅक्शन्समध्ये प्रचंड वाढ
• स्टार्टअप आणि डिजिटल उद्योजकतेला चालना
• इंटरनेट ग्रामीण भागात पोहोचवणे
• ऑनलाइन शिक्षण आणि कामकाजाची सुरुवात

My Bharat 2.0 - नव्या भारतासाठी डिजिटल संधी
MY Bharat (Mera Yuva Bharat) ही भारत सरकारने सुरू केलेली एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जी देशातील तरुणांना राष्ट्रीय विकासात सहभागी होण्याची संधी देते.
आणि आता My Bharat 2.0 लॉन्च केले आहे.

🎯 My Bharat 2.0 चे मुख्य उद्दिष्ट :-
• तरुण पिढीला लोकसेवेमध्ये भाग घेण्याची संधी देणे.
• स्किल डेव्हलपमेंट, स्वयंसेवा आणि रोजगार निर्माण करणे.
• डिजिटल माध्यमातून शासनाशी थेट संवाद

My Bharat 2.0 चे प्रमुख वैशिष्ट्ये :-
🔗 एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म
My Bharat 2.0 ही एक AI-आधारित सिस्टिम आहे, जी युवकांची प्रोफाइल, स्किल्स, आवड, लोकेशन यावर आधारित त्यांना योग्य संधी देण्याचे काम करते.

🧠 स्किल डेव्हलपमेंट
• विविध ई-लर्निंग कोर्सेस
• इंटर्नशिप आणि अप्लाय करणे सोपे
• Digital Skilling, AI, Coding, Robotics यासारख्या आधुनिक कौशल्यांवर भर

🤝 स्वयंसेवा संधी (Volunteering)
• स्वच्छ भारत, जल संरक्षण, महिला सक्षमीकरण यासारख्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होता येते.
• यामुळे नागरिक भावना, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्व कौशल्य वाढते.

🧑‍💼 करिअर गाइडन्स आणि रोजगार संधी
• रिअल टाइम नोकरी सूचना
• युवकांसाठी मेंटरिंग आणि मार्गदर्शन
• स्टार्टअप्सशी कनेक्ट होण्याची संधी

Digital India + My Bharat 2.0 = डिजिटल भारताचा पुढचा टप्पा

Digital India + My Bharat 2.0


स्मार्ट इंडिया साकारण्यासाठी एकत्रित प्रयत्न
Digital India मुळे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार झाले, हा संपूर्ण उपक्रम भारताला Viksit Bharat २०४७ च्या दिशेने घेऊन जातो.

Digital India मुळे भारत डिजिटल झालाच, पण आता My Bharat 2.0 मुळे तो सशक्त आणि युवाशक्तीने प्रेरित होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "Viksit Bharat" या संकल्पनेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

📊 काही महत्त्वाचे आकडे
• 80 कोटींपेक्षा जास्त UPI वापरकर्ते
• 13 कोटींहून अधिक DigiLocker खाते
• 11 कोटींहून अधिक स्वयंसेवक My Bharat मध्ये नोंदणीकृत
• 50,000 हून अधिक स्वयंसेवा प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्हिजन
“Youth are not only the beneficiaries but also the driving force of change.” — पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांना हे ठाम वाटते की तरुणच भारताला पुढे नेतील. My Bharat 2.0 चा उद्देश तरुणांना 'job seekers' पासून 'job creators' बनवण्याचा आहे.

सामान्य नागरिकांसाठी फायदे :-

सामान्य नागरिकांसाठी फायदे


My Bharat 2.0 कसं जॉइन कराल?
🌐 वेबसाईटला भेट द्या - https://mybharat.gov.in
📲 मोबाईल नंबर व आधारद्वारे लॉगिन करा.
📋 तुमचे प्रोफाइल पूर्ण करा.
🎯 इच्छित स्किल्स, सेवा, किंवा इंटरेस्ट निवडा.
✅ स्वयंसेवा किंवा स्किल कोर्सेसमध्ये सहभागी व्हा.

जर तुम्हीही भारताचे भविष्य घडवायला इच्छुक असाल, तर My Bharat 2.0 मध्ये आजच सहभागी व्हा!
थोडे नवीन जरा जुने