How to Update Your Aadhaar Details Easily Using the New Aadhaar App

नवीन आधार ॲपद्वारे Aadhaar Details कसे अपडेट कराल?


How to Update Your Aadhaar Details Easily Using the New Aadhaar App



भारतातील बहुतेक सरकारी सेवा, बँकिंग, सबसिडी, KYC किंवा डिजिटल ओळख प्रक्रियेत आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. वेळोवेळी पत्ता, मोबाईल नंबर, फोटो, लिंग, जन्मतारीख किंवा इतर माहिती बदलण्याची गरज भासू शकते. यासाठी UIDAI ने नवीन Aadhaar App (mAadhaar चे अपडेटेड व्हर्जन) लॉन्च केले असून त्याद्वारे Aadhaar अपडेट करणे आता अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित झाले आहे.

या ब्लॉगमध्ये आपण New Aadhaar App चा वापर करून कोणती Aadhaar माहिती अपडेट करता येते, कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि संपूर्ण प्रक्रिया कशी आहे हे जाणून घेऊ.

UIDAI ने सादर केलेले नवीन आधार ॲप हे एक सुरक्षित, वापरण्यास सोपे आणि सर्व सुविधा एका ठिकाणी देणारे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या ॲपमध्ये तुम्ही खालील सुविधा घेऊ शकता.
• Aadhaar कार्ड डाउनलोड
• मोबाईल नंबर अपडेट
• Aadhaar पत्ता, नाव, जन्मतारीख इ. अपडेट
• ऑनलाइन डॉक्युमेंट अपलोड
• Aadhaar सर्व्हिस रिक्वेस्ट
• Aadhaar Authentication History

Aadhaar मधील कोणती माहिती ॲपवरून अपडेट करता येते?

नवीन Aadhaar App मध्ये खालील तपशील घरबसल्या अपडेट करू शकता.
• पत्ता (Address)
• नाव (Name)
• जन्मतारीख (Date of Birth)
• लिंग (Gender)
• फोटो (Photo)
• मोबाईल नंबर/ईमेल – OTP व्हेरिफिकेशनद्वारे

Aadhaar अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

तुम्हाला कोणती माहिती बदलायची आहे त्यानुसार UIDAI ने मान्य केलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
पत्ता अपडेट : पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, पोस्ट ऑफिस स्टेटमेंट, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/गॅस बिल इ.
नाव/DOB अपडेट : जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, पासपोर्ट, PAN, सरकारी आयडी
मोबाईल/ईमेल अपडेट : फक्त OTP व्हेरिफिकेशन

New Aadhaar App वर आधार तपशील अपडेट कसे करायचे?

१. Google Play Store किंवा Apple App Store वर जा. New Aadhaar App – UIDAI शोधा. ॲप डाउनलोड करून इंस्टॉल करा.
२. ॲप ओपन करा. तुमचा Aadhaar नंबर टाका. UIDAI कडून आलेला OTP टाकून लॉगिन करा.
३. होम स्क्रीनवर Services सेक्शन वर क्लिक करा. तुम्हाला बदलायचा असलेला तपशील निवडा.
४. अपडेट रिक्वेस्टसाठी ₹७५ फी. UPI/डेबिट कार्ड/नेट बँकिंगने पेमेंट करा.
४. सर्व माहिती तपासून Submit वर क्लिक करा. स्क्रीनवर URN (Update Request Number) मिळेल याचा वापर करून तुम्ही अपडेट स्टेटस ट्रॅक करू शकता.

Aadhaar अपडेट किती दिवसांत होते?

UIDAI नुसार, सामान्यतः ५–७ कामकाजाच्या दिवसांत अपडेट प्रक्रिया पूर्ण होते. कधी कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननुसार वेळ थोडा जास्त लागू शकतो.

नवीन Aadhaar App वापरण्याचे फायदे

• घरबसल्या Aadhaar अपडेट
• जलद व्हेरिफिकेशन
• सुरक्षित लॉगिन आणि डेटा प्रोटेक्शन
• ऑनलाइन सर्व्हिस रिक्वेस्ट
• पेमेंट, डाउनलोड आणि स्टेटस ट्रॅकिंग एका ॲपमध्ये

नवीन Aadhaar App मुळे आधार अपडेट प्रक्रिया खूप सोपी, वेगवान आणि डिजिटल झाली आहे. आता तुम्हाला केंद्रावर जाण्याची गरज नाही—स्मार्टफोनमधूनच Aadhaar details अपडेट करू शकता. सरकारी योजना, बँकिंग, KYC आणि इतर डिजिटल सेवांसाठी Aadhaar नेहमी अपडेटेड ठेवणे फायदेशीर आहे.
थोडे नवीन जरा जुने