Smart TV Guide : Features, Tips, and Hidden Settings

स्मार्ट टीव्ही वापरण्याचे स्मार्ट टिप्स

स्मार्ट टीव्ही ही आजच्या डिजिटल युगातील एक अत्यंत उपयुक्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भेट आहे. पारंपरिक टीव्हीच्या तुलनेत स्मार्ट टीव्ही अधिक कार्यक्षम, इंटरऍक्टिव्ह आणि इंटरनेटशी जोडलेले असते. पण हे सर्व फायदे मिळवण्यासाठी स्मार्ट टीव्हीचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. या ब्लॉगमध्ये आपण स्मार्ट टीव्ही वापरताना उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत.

Smart TV Guide : Features, Tips, and Hidden Settings


स्मार्ट टीव्ही म्हणजे एक असा टीव्ही जो इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो आणि त्यावर विविध अ‍ॅप्स, व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, गेम्स, ब्राउझर यांचा वापर करता येतो. यामध्ये Android TV, Google TV, WebOS, Tizen OS अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स असतात.

स्मार्ट टीव्ही वापरण्याचे स्मार्ट टिप्स :-
• वाय-फाय कनेक्शनची योग्य निवड करा
स्मार्ट टीव्ही साठी इंटरनेट आवश्यक असतो. त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या वाय-फाय कनेक्शनचा वेग आणि स्थिरता महत्त्वाची आहे. शक्यतो 5GHz नेटवर्क वापरा जेणेकरून व्हिडीओ स्ट्रीमिंग, अ‍ॅप्सचा वापर किंवा गेमिंगमध्ये अडथळे येणार नाहीत.

• ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर अपडेट करत राहा
स्मार्ट टीव्हीचा सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी तो नेहमी अपडेट ठेवणे गरजेचे आहे. अनेक वेळा नवीन फीचर्स, सुरक्षा सुधारणा आणि अ‍ॅप सपोर्ट हे अपडेट्सद्वारे मिळतात. सेटिंग्जमध्ये जाऊन "Software Update" पर्याय तपासा आणि अप-टू-डेट रहा.

• मोबाईलशी किंवा स्मार्टफोनशी कनेक्ट करा
Google Cast, Miracast, AirPlay यांसारख्या टेक्नॉलॉजीद्वारे तुम्ही तुमचा स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप टीव्हीला वायरलेस कनेक्ट करू शकता. यामुळे फोटो, व्हिडीओ, प्रेझेंटेशन किंवा गेम मोठ्या स्क्रीनवर बघता येतात.

• स्ट्रीमिंग अ‍ॅप्स वापरण्याची योग्य पद्धत
Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar, YouTube यांसारख्या अ‍ॅप्सचा वापर स्मार्ट टीव्हीवर सहज करता येतो. पण हे अ‍ॅप्स लॉगिन करताना तुमचं खातं सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. शक्य असल्यास टू फॅक्टर ऑथेंटीकेशन (Two-factor authentication) वापरा.

• स्टोरेज ठेवा
स्मार्ट टीव्हीमध्ये मर्यादित स्टोरेज असते. अ‍ॅप्स, गेम्स किंवा कॅशेमुळे हे स्टोरेज भरते आणि टीव्ही स्लो होतो. वापरात नसलेल्या अ‍ॅप्स डिलीट करा आणि "Clear Cache" पर्याय वापरून मेमरी क्लिअर करा.

• परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ‘Reboot’ करा
स्मार्ट टीव्ही वारंवार चालू ठेवला जातो, त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स स्लो होऊ शकतो. आठवड्यातून एकदा टीव्ही पूर्णपणे बंद करून रिबूट केल्यास सिस्टीम रीफ्रेश होते आणि परफॉर्मन्स चांगला राहतो.

• लहान मुलांनासाठी पॅरेंटल कंट्रोल सेट करा
जर घरात लहान मुलं असतील, तर स्मार्ट टीव्हीवरील कंटेंटवर मर्यादा घालण्यासाठी Parental Control सेटिंग्स वापरा. अ‍ॅप्सवर पासवर्ड लावा, कंटेंट रेटिंग सेट करा आणि मुलांचे बघण्याचे वेळापत्रक ठरवा.

• व्हॉइस कंट्रोल वापरा
अनेक स्मार्ट टीव्हीमध्ये Google Assistant किंवा Alexa सारखे व्हॉइस असिस्टंट्स असतात. यांचा वापर करून तुम्ही टीव्ही चालू/बंद करणे, अ‍ॅप्स ओपन करणे, YouTube सर्च करणे इत्यादी गोष्टी सहज करू शकता.

• टीव्ही स्क्रीन क्लिनिंग आणि देखभाल
स्मार्ट टीव्हीची स्क्रीन ही नाजूक असते. ती साफ करताना मायक्रोफायबर कापड वापरा. स्क्रीनवर थेट पाणी किंवा क्लिनर स्प्रे करू नका. यामुळे स्क्रीन खराब होण्याची शक्यता असते.

• टीव्हीवर गेमिंगचा अनुभव घ्या
अनेक स्मार्ट टीव्हीवर Bluetooth गेमपॅड्स सपोर्टेड असतात. त्यामुळे तुम्ही Google Play Store मधून गेम डाउनलोड करून मोठ्या स्क्रीनवर गेमिंगचा आनंद घेऊ शकता.

स्मार्ट टीव्ही खरेदी करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
जर तुम्ही अजून स्मार्ट टीव्ही घेतलेला नसेल आणि घेण्याचा विचार करत असाल, तर खालील मुद्द्यांवर लक्ष द्या :-
• स्क्रीन साइज - घरातील खोलीच्या आकारानुसार स्क्रीन साइज निवडा.

• रिझोल्यूशन - कमीतकमी Full HD, शक्य असल्यास 4K UHD टीव्ही निवडा.

• ऑपरेटिंग सिस्टीम - Android TV, Google TV सारखे सुलभ UI असलेले टीव्ही निवडा.

• स्मार्ट फीचर्स - व्हॉइस असिस्टंट, स्क्रीन मिररिंग, ब्लूटूथ, वाय-फाय यांसारखे फीचर्स तपासा.

• HDMI/USB पोर्ट्स - पुरेसे पोर्ट्स असल्याची खात्री करा.


स्मार्ट टीव्ही हा केवळ टीव्ही नसून एक डिजिटल एंटरटेनमेंट हब आहे. त्याचा योग्य वापर केल्यास तो तुमच्या दैनंदिन मनोरंजनाचा दर्जा उंचावू शकतो. या ब्लॉगमध्ये दिलेल्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा स्मार्ट टीव्ही अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि मजेदार पद्धतीने वापरू शकता.
थोडे नवीन जरा जुने