"AI Impact Summit MyGov लोगो डिझाईन स्पर्धा – तुमचं डिझाईन ठरू शकतो राष्ट्रीय ओळख!"
AI Impact Summit हा एक राष्ट्रीय स्तरावरील परिषद आहे, जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा विविध क्षेत्रांवरील परिणाम आणि भविष्यातील संभाव्यता यावर चर्चा केली जाते. शासकीय धोरण, औद्योगिक प्रगती, शिक्षण, आरोग्य आणि डिजिटल इंडिया यांसारख्या क्षेत्रांमध्ये AI कसा वापरता येईल, हे या परिषदेत मांडले जाते.
स्पर्धेचे उद्दिष्ट :-
AI Impact Summit 2025 साठी एक आकर्षक, अर्थपूर्ण आणि नाविन्यपूर्ण लोगो तयार करणे हेच या स्पर्धेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हा लोगो भारताच्या डिजिटल युगातील AI क्रांतीचे प्रतीक असावा, जो देशाच्या प्रगतीची ओळख करून देईल.
कोण सहभागी होऊ शकतो?
• भारतातील कोणीही नागरिक (डिझायनर, विद्यार्थी, हौशी कलाकार)
• व्यक्ती किंवा गट (टीम) स्वरूपात
• सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही!
स्पर्धेचे फायदे :-
• राष्ट्रीय स्तरावर ओळख - तुमचा लोगो भारत सरकारच्या अधिकृत कार्यक्रमात वापरला जाईल.
• प्रशस्त प्रमाणपत्र - MyGov कडून अधिकृत प्रमाणपत्र.
• आकर्षक बक्षिसे - विजेत्याला मिळेल रोख बक्षीस (रक्कम MyGov वेबसाइटवर नमूद केलेली आहे).
• डिजिटल पोर्टफोलिओसाठी संधी - तुमचे नाव सरकारी आणि नामांकित माध्यमांतून प्रसिद्ध होऊ शकते.
लोगो डिझाईन करताना लक्षात घ्या :-
• लोगो साधा, लक्षवेधी आणि लक्षात राहणारा असावा.
• त्यामध्ये AI, टेक्नोलॉजी, भारताची संस्कृती आणि भविष्यमूल्य यांचा समावेश असावा.
• डिझाईन 2D स्वरूपात असावा आणि उच्च रिझोल्युशनमध्ये (.png/.jpg/.svg) पाठवावा.
• मूळ डिझाईनच पाठवावे; कोणत्याही प्रकारची कॉपीराइट उल्लंघन टाळावे.
स्पर्धेमध्ये सहभागी कसे व्हावे?
• MyGov वेबसाइटला भेट द्या - My GOV Website
• आपलं नाव, पत्ता, संपूर्ण माहिती भरा.
• "AI Impact Summit Logo Design Contest" या विभागात जा.
• तुमचा लोगो अपलोड करा आणि आवश्यक माहिती भरा.
• शेवटची तारीख :- १२ जून २०२५
AI Impact Summit साठी लोगो डिझाईन करणे ही केवळ एक स्पर्धा नाही, तर तुमच्या कल्पकतेला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्याची संधी आहे.
लवकरात लवकर सहभागी व्हा - My GOV Website