इंटरनेटशिवाय पैसे पाठवण्याचे ५ सोपे आणि सुरक्षित मार्ग
आजच्या डिजिटल युगात UPI, इंटरनेट बँकिंग, आणि मोबाईल अॅप्सद्वारे पैसे पाठवणे अत्यंत सोपे झाले आहे. मात्र अजूनही भारतातील बरेचसे ग्रामीण भाग हे इंटरनेटच्या सुविधांपासून वंचित आहेत. अशा ठिकाणी इंटरनेटशिवाय पैसे पाठवणे हा मोठा प्रश्न असतो. पण काळजी करण्याची गरज नाही! कारण आता इंटरनेटशिवायसुद्धा पैसे पाठवण्याचे अनेक सोपे आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत. या ब्लॉगमध्ये आपण ग्रामीण भागात इंटरनेटशिवाय पैसे कसे पाठवावे हे जाणून घेणार आहोत.
भारत डिजिटल दिशेने झपाट्याने वाटचाल करत असला, तरीही ग्रामीण भागात अजूनही इंटरनेट सुविधा सीमित आहेत. अशा परिस्थितीत खालील पर्याय हे नागरिकांना वित्तीय समावेशनात मदत करतात. USSD सेवा, AEPS, पोस्ट ऑफिस सेवा, मोबाईल वॉलेट एजंट आणि बँक शाखा या सर्व मार्गांनी इंटरनेटशिवायही पैसे पाठवणे शक्य होते – आणि तेही सुरक्षितपणे.
१. USSD बँकिंग (डायल करून पैसे पाठवा)
USSD कोड :- *99#
USSD (Unstructured Supplementary Service Data) ही सेवा खास अशा वापरकर्त्यांसाठी आहे जे 2G फोन वापरतात आणि इंटरनेट सुविधा नाही.
कसे वापरावे?
• तुमच्या मोबाईलमधून *99# डायल करा.
• तुमची भाषा निवडा.
• बँकेचा नाव टाका आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाका.
• 'Send Money' पर्याय निवडा.
• IFSC व अकाउंट नंबर किंवा मोबाइल नंबर वापरून पैसे पाठवा.
• MPIN टाका आणि व्यवहार पूर्ण करा.
२. आधार-आधारित पेमेंट सिस्टम (AEPS)
AEPS म्हणजे काय?
AEPS (Aadhaar Enabled Payment System) ही NPCI द्वारा विकसित केलेली प्रणाली आहे जिच्यात आधार कार्ड आणि बायोमेट्रिकचा वापर करून पैसे व्यवहार करता येतात.
कसे वापरावे?
• जवळच्या CSC (Common Service Center) किंवा आधार सेवा केंद्रात जा.
• आधार क्रमांक द्या.
• बँक निवडा आणि रक्कम सांगा.
• अंगठ्याचा स्कॅन (बायोमेट्रिक) करा.
• व्यवहार पूर्ण झाला की पावती मिळते.
३. पोस्ट ऑफिसच्या सहाय्याने पैसे पाठवा
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) :-
ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस जाळे खूप विस्तृत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत ग्रामीण नागरिकांना वित्तीय सेवा सहज उपलब्ध होतात.
कसे वापरावे?
• जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा.
• पैसे पाठवण्याचा फॉर्म भरा.
• Beneficiary चा नाव, पत्ता आणि बँक माहिती द्या.
• रक्कम भरा आणि व्यवहार पूर्ण करा.
४. मोबाईल वॉलेट एजंट किंवा दुकानांद्वारे पैसे पाठवा
Paytm, PhonePe, Airtel Payments Bank एजंट
कसे वापरावे?
• तुमच्या गावात किंवा जवळच्या बाजारात उपलब्ध मोबाईल पेमेंट एजंटकडे जा.
• आपली रक्कम एजंटला द्या.
• Beneficiary चा मोबाइल नंबर द्या.
• एजंट त्याच्या अॅपद्वारे इंटरनेटवरून व्यवहार करतो.
• तुम्हाला एसएमएस पावती मिळते.
५. बँक शाखांद्वारे थेट पैसे ट्रान्सफर
कसे वापरावे?
• बँकेच्या जवळच्या शाखेत जा.
• 'NEFT' किंवा 'IMPS' फॉर्म भरा.
• Beneficiary चा IFSC कोड व खाती माहिती भरा.
• काउंटरवर पैसे द्या.
• व्यवहाराची पावती मिळवा.
अतिरिक्त टिप्स :-
✅ व्यवहार करताना काय लक्षात घ्यावे?
• नेहमी अधिकृत व विश्वासार्ह एजंट/केंद्रावरूनच व्यवहार करा.
• आधार क्रमांक आणि बँक माहिती योग्यरीत्या द्या.
• व्यवहारानंतर पावती अवश्य घ्या.
• तुमचे पासवर्ड, MPIN इतर कोणालाही सांगू नका.
माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.
लेखक :- अभिषेक हजारे | bafarlalinfo.in